गेल्या चार वर्षांपासून आपल्याकडे १०८ ही विशेष रूग्णवाहीका सेवा सुरू झाली आहे.या रूग्णवाहीकेचे वैशिष्टय म्हणजे रूग्ण रूग्णालयात संदर्भित करत असताना डाक्टर सोबत राहतील.ही रूग्णवाहीका Oxygen,Emergency Medicine, Pulse Oximeter व छोट्या ventilator आदी सुविधांनी सुसज्ज असणे अभिप्रेत आहे.अत्यवस्थ व गंभीर आजाराच्या रूग्णांची संदर्भित होत असताना हेळसांड होऊ नये हा यामागे मूळ हेतु आहे.शिवाय रात्री अपरात्री घरून विशेषत: लांबच्या खेड्यापाड्यातून रूग्णालयात येण्यासाठी वाहन मिळणे दुरापास्त,अशा वेळी कोणालाही डाक्टरांसह रूग्णवाहीका घरी येऊन रूग्णाला रूग्णालयात घेऊन जाणे म्हणजे ही पाश्चात्त्य किंवा विकसित देशातील तत्पर व अद्ययावत रूग्णवाहीका सेवे सारखी आकर्षक सेवा वाटेल.जवळपास सर्वच तालुक्यात किमान दोन ॲम्ब्युलन्स मिळाल्या आहेत.अतिदुर्गम भागाला विशेष प्राधान्य दिले गेले आहे.पण खरच या सेवेमुळे संदर्भ सेवा बळकट झालीय का? या ॲम्ब्युलन्सवर असणा-या डाक्टरांचा खरच काही उपयोग होतो का?
दुर्देवाने वस्तुस्थितीत विशेष काही फरक पडलेला नाही.पहिली गोष्ट म्हणजे १०८ नंबर वर फोन केल्यावर तो लागेलच याची हमी नसते.लागलाच तर समोरून सीबीआय सारख्या तपास यंत्रणा
सुध्दा विचारत नसतील ऐवढे चिकित्सक प्रश्न विचारले जातात.त्यांनंतर उपलब्ध असलेल्या जवळच्या रूग्णवाहीकेच्या डाक्टरांशी बोलणं करून देण्यासाठी किमान १५ मिनिट किंवा कधी कधी ३० मिनटे प्रतिक्षा करावी लागते.तस पाहील तर डाक्टरांशी संपर्क होणे हे काम फक्त ५ मिनीटात व्हायला हवे.बरेचदा ॲम्ब्युलन्स रूग्णालयाच्या आवारातच असते.रूग्णवाहीकेचा चालक आसपासच दिसतो ,मग नेमके डाक्टर कुठे गडप झालेले असतात कुणास ठाऊक? की ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क व्हायला १५-२० मिनिटे लागावीत ? डाक्टरांशी संपर्क झाल्यावर मग अमुक ठिकाणीच का न्यायच आहे,तमुक ठिकाणी का नाही? बेड बुक केला आहे का? सिव्हील सर्जनची सही आहे का ? असे अडथळावजा प्रश्न या डाक्टरांकडून विचारले जातात.मुळात या डाक्टरांच्या कुवतीवर शंका घेण्यास वाव आहे.या सेवेवर भरती केलेले डाक्टर आयुर्वेदाचे आहेत. त्यांच्या पथीबाबत आक्षेप असायचे कारण नाही.पण केवळ प्रॅक्टिस करून ज्यांचा उदरनिर्वाह होत नाही,मुख्यत्वे त्यांनीच ही १०८ ची नोकरी जोडधंदा म्हणून पत्करली आहे. त्यांना रूग्ण संदर्भित करत असताना अत्यवस्थ रूग्णांवर उपचार (Emergency Medical Services )करायचे विशेष वेगळे प्रशिक्षण वगैरे दिल्याचे ऐकिवात नाही.किंबहुना त्यांना दिलेल्या Emergency Medicine चे account तपासल्यास ९९% औषधी या वापरल्या गेल्या नसतील याची १००% खात्री बाळगण्यास काहीच हरकत नाही.मुळात रूग्ण संदर्भित करत असताना त्यातही विशेष करून गंभीर आजार असलेल्या रूग्ण संदर्भित करत असताना डाक्टरांनी रूग्णासोबत बसणे अपेक्षित आहे.मात्र जवळपास सर्वच डाक्टर रूग्णवाहीकेत पुढे ड्रायव्हर शेजारी बसतात.म्हणजे रूग्ण डाक्टरांच्या देखरेखीखाली संदर्भित होणे या पहिल्या उद्देशालाच हरताळ फासला जातो.जर प्रत्येक रूग्णाबाबत असे होत असेल तर मग प्रत्येक रूग्ण वाहीकेवर २-३ डाक्टर नेमण्याची व त्यांच्या वेतनावर ख्रर्च करण्याची काहीच गरज नाही.काही महाभाग तर रूग्णासोबत जातच नाहीत.विशेषत: रूग्ण जर घरून आणायचा असेल तर ड्रायव्हलाच पाठवतात.रूग्णाला रूग्णालयाजवळ आणल्यावर मग रूग्णवाहीकेत चढतात.तर काही महाराजांना अत्यवस्थ रूग्ण घेण्यासाठी रूग्णालयात येणेही जीवावर येते.त्यांचे ड्रायव्हर पहिल्यांदा रूग्ण गाडीत चढवून घेतात व नंतर डाक्टरांना त्याच्या घरी आणायला अम्ब्युलन्स घेऊन जातात.काही जण तर यापेक्षाही सुपीक डोक्याचे असतात.लांबच्या रूग्णालयात न्यायचा रूग्ण थेट संदर्भित केलेल्या रूग्णालयात न नेता मार्गावरील मधल्या गावातील एखाद्या दुस-या १०८ च्या रूग्णवाहीकेला सोपवून येतात.त्यांच्या भाषेत रूग्णाला दुस-या १०८ मध्ये रिले (Relay)करतात.यात Serious असलेल्या रूग्णाचे विनाकारण चढण्या उतरण्यामुळे अतोनात हाल होतात.
प्रसूती झालेले रूग्ण,कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेले रूग्ण घरी सोडण्यासाठी या १०८ सेवेचा काडीचाही उपयोग होत नाही. Call नसताना OPD च्या वेळेत डाक्टरांनी रूग्णालयात थांबून OPD ला मदत करावी असे वरिष्ठांचे आदेश सोईस्करपणे धाब्यावर बसवलेले आहेत.दुसरा अनिष्ट परिणाम म्हणजे ज्या प्रा.आ.केंद्रांना जवळ १०८ ची सुविधा उपलब्ध आहे ,त्यांनी रात्री आलेले सरसकट सगळे रूग्ण १०८ मध्ये बसवून RH किंवा SDH ला संदर्भित करायचे असतात असाच ठाम समज करून घेतला आहे.त्यामुळे PHC वरून अनावश्यक रेफरल वाढले आहेत.अजून एक दुष्परिणाम म्हणजे रात्री अपरात्री संदर्भसेवेसाठी १०८ असते, या गृहीतकामुळे SDH किंवा RH चे ड्रायव्हर रात्री सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.कधी कधी तर रूग्णालयाच्या आवारात ४-५ ॲम्ब्युलन्स दिसतात परंतु रूग्णासाठी एकही ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही.म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.
SDH च्या रूग्णवाहीकांबाबत निदान वैद्यकिय अधिक्षक जबाबदार असतात.त्याबाबत वरिष्ठांकडून नियमित लेखापरिक्षण होते.पण १०८ बाबत तर कुणाकडे काही तक्रार करायची सोय नाही.कारण यांचे कंत्राट खाजगी कंपनीस दिलेले आहे. त्यामुळे १०८ च्या District Manager ला manage करून काहीही क्षुल्लक कारण दाखवून गाडी बंद दाखवायची नि घरी झोपा काढायच्या असे प्रकार वारंवार होतात. यावर जालीम उपाय म्हणजे या डाक्टर व ड्रायव्हरांना संदर्भित केलेल्या रूग्णसंख्येनुसार किंवा गाडीने कापलेल्या अंतरानुसार जर वेतन दिले तरच १०८ या रूग्णवाहीका सेवेचे काम सुरंळीत व पूर्ण क्षमतेने होईल.नाहीतर बिनकामाचा हा पांढरा हत्ती पोसणे कठिण जाईल.